मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त भरपूर लोक चारोळ्या देखील शोधात असतात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त काही लोकांना चारोळ्या देखील म्हणायचे असतात तर काही खाली चारोळी दिलेले आहे ते तुम्ही युज करू शकता आणि तुमचं भाषण योग्य रित्या दमदार बनवू शकता.
Marathwada Mukti Sangram Din Charoli Marathi | मराठवाडा मुक्ती संग्राम दिन चारोळी
भारतीय
इतिहासात
तो दिवस अमर झाला
17 सप्टेंबरला
आमुचा मराठवाडा मुक्त झाला
|
स्वामी रामानंद तीर्थांनी
मराठवाड्याच्या मुक्तीसाठी
केले जीवनाचे रान
असे या वीर पुत्राचा
आम्हा सदैव वाटतो सन्मान
|
स्वप्ने पडली
उषःकाळाची
हाती मात्र अंधकार
देश सारा उजळला जरी
मराठवाड्याची काजळ रात
|
अशा या
संपन्न मराठवाड्याचा मला
आहे अभिमान !
म्हणून तर गातो मी मराठवाड्याचे
गुणगान !!
|
माझ्या
मराठवाड्यात यादवांची राजधानी !
जगप्रसिद्ध इथली अजिंठा वेरूळ लेणी !!
साऱ्या जगात नावलौकीक आहे
आमची पैठणी !!
|
मराठवाड्यातून
वाहतात पूर्णा, पैनगंगा
मांजरा, सिंधफना
गोदावरी !
हिऱ्या मोत्यांनी बहरली
आमची शिवार सारी !!
|
सरदार वल्लभभाई पटेल यांनी
आपले
कणखर नेतृत्व दाखविले !
जुलमी निजामशाहीस देशबांधवा
समोर झुकविले !!
|
मराठवाडा
आमुचा मान,
सन्मान अन अभिमान
म्हणून तर उत्साहाने साजरा करू
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन !!
|
मराठवाडा
मुक्ती संग्राम दिन
चिरायू होवो,
भारत माता की जय! वंदे मातरम् !
|
होती संतांची
भूमी
निजामाची लागली नजर
सरदार वल्लभभाई पटेलांनी
उतरवली निजामाची नजर
|
स्वामी
रामानंद तीर्थ
यांचे कार्य आहे अनमोल
त्यांचे उपकराचे
कधी ना फिटणार मोले
|
महाराष्ट्राच्या
शिरपेचात रोवून मानाचा तुरा
मराठवाडा गातो गुलामगिरी मुक्ततेची गाथा !
निजामशाहीला दाखवून दिला लढवय्या बाणा
लोहपुरुषांच्या चरणी झुकवू आदराने माथा !!
|
भेटले होते
स्वातंत्र्य, तरी होतो
आम्ही पारतंत्र्यात !
झाला चोहीकडे प्रकाश, तरी मराठवाडा अंधकारात !!
पेटले ते पुन्हा पेटले स्वातंत्र्यासाठी, निधड्या छातीचे रणात !
देश सारा उजळे मराठवाडा, जिंकला भारताच्या हृदयात !!
|
अखंड
महाराष्ट्राची, मीच
शान आहे!
मराठी भाषेचा, मी अभिमान आहे!!
मराठवाडा मी, आलीशान
आहे!
आघात किती झाले, तरी पाषान आहे!!
|
जरी जाहला
स्वतंत्र भारत देश !
मराठवाडा होता निजामाचा प्रदेश !!
लोहपुरुषाने फौजेला दिला आदेश !
मराठवाडा मुक्तीसंग्राम देतो राष्ट्रीय एकतेचा
संदेश !!
|
निजाम
तोंडघशी पडला…
मराठवाडा भारताचा झाला …!
हजारो सलाम या दिवसाला…
महाराष्ट्राचा हा एक राष्ट्रीय सण झाला…!!
|
निष्कर्ष
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त भरपूर लोकांना चारोळी देखील म्हणावयाचे असते तर त्यासाठी आम्ही काही वरील चारोळी दिलेले आहेत ते तुम्ही मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त भाषण आणि त्यामध्ये युज करू शकता
Comments
Post a Comment