प्रेरणादायी सुविचार आपली जीवांमध्ये एक मार्गदर्शक म्हणून कार्य करत असतात म्हणून आपण ते विचार वाचले पाहिजेत आत्मसात केल पाहिजेत तेच आज आपण बघणार आहोत
आत्मविश्वास सुविचार मराठी |Success Marathi Suvichar
- गरजा आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो आणि त्याचा समतोल साधतांना संपूर्ण आयुष्य निघून जात.
|
- संधी आणि सुर्योदय दोन्हीत एक साम्य आहे, उशीरा जागे होणा-याच्या नशीबी दोन्ही नसतात.
|
- स्वत:च्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा कि, चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहीजे.
|
- व्यक्तिमत्त्वाला आणि स्वभावाला न शोभणा-या भूमिका नाईलाजास्तव साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आपले आयुष्य.
|
- संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरी.. जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचे अस्तित्व शाबूत असते.
|
- पराभवाची भीती कुणीच बाळगू नये एक मोठा विजय आपले मागील सर्व पराभव पुसून टाकू शकतो.
|
- स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की,परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे.
|
- विश्रांतीची किंमत कळण्याकरिता आधी कष्टाचे महत्व कळले पाहिजे कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत सांगते.
|
Comments
Post a Comment